वृक्षारोपण करून युवा नेते वरुण पांडे यांचा वाढदिवस साजरा; स्व. दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण

Fri 10-Jul-2026,09:49 PM IST -07:00
Beach Activities

वृक्षारोपण करून युवा नेते वरुण पांडे यांचा वाढदिवस साजरा; स्व. दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव, युवा उद्योजक, समाजसेवक तथा दत्ता मेघे विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष वरुण पांडे यांनी आपला वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. स्वर्गीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय वरुण पांडे यांनी घेतला होता.

यापूर्वीच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना, मित्रपरिवाराला व शुभेच्छुकांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार अथवा फुले न आणण्याचे आवाहन केले होते. त्याऐवजी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वरुण पांडे यांनी स्वतः वृक्षारोपण करून उपस्थित युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. वाढदिवसासारखे वैयक्तिक क्षणही समाजहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केले, तर त्याचे खरे सार्थक होईल."

दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत यंदाही त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. या कार्यक्रमात सौ. एलिन पांडे, कोमल निवळ, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण तिवारी, धनराज कुबडे, विशाल ठाकरे, विनोद महल्ले आणि अभिषेक पांडे यांनी सहभाग घेतला.

स्वर्गीय दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत साधेपणा, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.