आदर्श बिगरशेती पत संस्थेत अध्यक्ष ब्रजभुषण बैस व उपाध्यक्ष कैलाश गजभिये यांची निर्विरोध निवड

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा -सालेकसा येथे 2004 ला स्थापन झालेली सालेकसा आदर्श ग्रामीण बिगरशेती पत संस्था सालेकसा येथे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी एक संजय गायधने यांच्या उपस्थितीत व देखरेख खाली नव्याने संचालक मंडळाची निवडणूक पार पडली असून सात सदस्यांची निर्विरोध निवड करण्यात आली व यामधुन सर्वानुमते संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून ब्रजभुषण बैस व उपाध्यक्ष कैलाश गजभिये यांची निर्विरोध निवड झाली तसेच सदस्य मुरलीधर कावळे,विजय फुंडे, नुरसिह हरीणखेडे,अनिल अग्रवाल,अनिता चुटे यांची नियुक्ती झाली. यावेळी संस्थेचे कर्मचारी महेंद्र बहेकार , दुर्गा अंबादे,रमेश चुटे, बाजीराव तरोने,वर्षा चौरे , मोनु गजभिये ,सीमा बैस यांची उपस्थिती असून नविन संचालक मंडळाला शुभेच्छा देण्यात आल्या.
Related News
आरमोरी आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77 वा वर्धापन दिन साजरा
02-Jun-2025 | Sajid Pathan
आमगाव नगर पालिका कॅम्पसमध्ये उपोषण करणाऱ्या दुर्गा कटरे यांची प्रकृती खालावली ग्रामीण रुग्णालयात दाखल
16-May-2025 | Sajid Pathan
वनविभागाच्या कामांवर असलेल्या रोजंदारी मजुरांची मजुरी १० महिन्यांपासून प्रलंबित
26-Mar-2025 | Sajid Pathan
मसूदा विधायक वीरेंद्र सिंह कानावत विधानसभा में बजट सत्र में भाग लेकर पहुंचे थाना विजयनगर
23-Feb-2025 | Sajid Pathan