श्री तुळजाभवानी शुगर प्रा. लि. आडगाव दराडे यांच्या सहयोगाने युनिट 2 मोळी पूजन संपन्न.

Sun 09-Nov-2025,11:15 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत, टोकाई, श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि. आडगाव दराडे यांच्या सहयोगाने (युनिट २) टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ या सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ आ. राजू नवघरे यांच्या हस्ते नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी चेअरमन भावना बोर्डीकर, आमदार यशवंत माने, मुंजाजी जाधव, विलास नादरे, सुनील बागल, देवानंद नरवाडे, जगदेव साळुंखे, विठ्ठल कराळे, रावसाहेब कराळे, कार्यकारी संचालक पी.जी. गायकवाड, चीफ इंजि. बी. सी. देशमुख, चीफ के. आर. एम. कदम, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, वाहतूकदार, कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.