श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा व भव्य वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन
श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा व भव्य वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन
तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर स्थानिक श्री संत साई गजानन महाराज व दुर्गा माता मंदिराच्या वतीने श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त संगीतमय श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन दिनांक २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत विविध वाङ्मयीन व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी हा एक भक्तिमय सोहळा ठरणार आहे.
या कथा सप्ताहाचे कथाव्यास ह. भ. प. नाथ महाराज (मु. वाठोडा, ता. आर्वी, जि. वर्धा) हे असून त्यांच्या प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दररोजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे—
सकाळी ६ ते ८ काकडा भजन,
९ ते १२ संगीतामय श्रीमद्भागवत कथा,
सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व भारुड,
तर रात्री ७ ते १० संगीतामय भागवत कथा होणार आहे.
संगीतमय भागवत कथेसाठी तबला वादक ह. भ. प. आकाश कडू (वरूड),
ऑर्गन वादक ह. भ. प. विक्की मुडे (इंजाळा),
पॅड वादक ह. भ. प. दिपेश वाघमारे (अमरावती)
तर झांज साथ ह. भ. प. संकेत खोडके (माढळी) करणार आहेत.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भव्य वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिंडी गावातील प्रमुख मार्गाने निघणार आहे. दिंडीमध्ये सहभागी भजनी मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, पुरस्कार न मिळालेल्या प्रत्येक भजनी मंडळाला ५०० रुपये व नारळ-पान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
याच दिवशी दुपारी १ वाजता काल्याचे कीर्तन व सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत साई गजानन महाराज व दुर्गा माता मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.