सुराज्यातून व्यसनमुक्त समाज निर्मितीकडे करा,नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन

Thu 19-Feb-2026,03:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील शिवाजी महाराज जयंती निमित्त. "यश हे नेहमी धैर्यवान आणि प्रयत्नशीलतेकडे वाटचाल करते" छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अन्यायाविरुद्ध लढून 'हिंदवी स्वराज्य' स्थापन केले. महाराजांचा हा लढा केवळ भूमीसाठी नव्हता, तर तो रयतेच्या स्वाभिमान, सुरक्षिततेसाठी होता. शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्तीसाठी सुराज्यातून व्यसनमुक्त समाज निर्मितीकडे वाटचाल करावी" असे नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांनी दि. १९ गुरूवारी सांगितले. 

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत, नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने तरुणांमध्ये व्यसनमुक्ती-नशामुक्ती जनजागरण राबविण्यात आले. नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, समिती सदस्य श्याम सोळंके, ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते तुकाराम झाडे, राकेश भट, रमेश वाबळे आदींची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल जनजागृती उपक्रमात पुढे म्हणाले, आजच्या काळात समाजासमोर 'व्यसनाधीनता', अमली पदार्थांचे सर्वात मोठे संकट उभे आहे. हे संकट स्वराज्यातील तरुण पिढीच्या भविष्याला पोखरत आहे. शिवाजी महाराजांच्या विचार, शिस्त, सामर्थ्य मूल्यांना रुजविण्यासाठी अमली पदार्थांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तरूणांनी संकल्प घेण्यासाठी पुढाकार घ्यावा..