माणुसकी अजूनही जिवंत आहे; हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत, वर्धा पोलिसांकडून युवकांचे कौतुक
माणुसकी अजूनही जिवंत आहे; हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत, वर्धा पोलिसांकडून युवकांचे कौतुक
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा शहरातील स्विमिंग पूल परिसरात नाविन्या जुनघरे यांचा मोबाईल हरवला होता. याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, गांधी नगर येथील मंगेश सावरकर, ओम अडेकार आणि आयुष निधेकर यांना सदर मोबाईल मिळून आला. त्यांनी प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखत तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल जमा केला.
सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल मेश्राम यांनी तक्रारदार नाविन्या जुनघरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल मंगेश सावरकर यांच्या हस्ते परत सुपूर्द केला.
या घटनेतून आजही समाजात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव जिवंत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मंगेश सावरकर, ओम अडेकार आणि आयुष निधेकर यांच्या प्रामाणिकपणाचे वर्धा पोलिसांकडून विशेष कौतुक करण्यात आले.