रामनगर पोलिसांची धडक कारवाई; घरातून ४ घातक शस्त्रे जप्त

Thu 21-May-2026,06:27 AM IST -07:00
Beach Activities

रामनगर पोलिसांची धडक कारवाई; घरातून ४ घातक शस्त्रे जप्त

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा : रामनगर पोलीस स्टेशनच्या वॉश आऊट मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पिपरी (मेघे) येथील आरोपी शुभम पापड्या पवार, रा. म्हाडा कॉलनी, वर्धा यांच्या घरावर छापा टाकून ४ घातक शस्त्रे जप्त केली.

या प्रकरणी पो. स्टे. रामनगर येथे अप. क्र. 477/26 अन्वये कलम 4, 25 हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा तथा मा. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम, ठाणेदार पोलीस स्टेशन रामनगर यांच्या निर्देशनात दारूबंदी पथकाचे अवि. बनसोड, अजहर खान, मुकेश वांदिले, विकी अणेराव व मनोज भोमले यांनी पार पाडली.

पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.