लोकजागर अभियान भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभा - शिंदे पांगरा सर्कल. आढावा बैठक संपन्न

Wed 20-May-2026,05:44 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत तालुक्यातील वसमत विधानसभा अंतर्गत पांगरा शिंदे येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

तळागाळातील प्रत्येक नागरिक लोकशाही प्रक्रियेशी अधिक सक्षमपणे जोडला जावा, या उद्देशाने मतदार विशेष सखोल पुनर्रचना (SIR) अभियानाबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथवरील मतदार यादी अचूक व अद्ययावत राहणे, नवीन मतदारांची वेळेत नोंदणी करणे तसेच त्रुटींचे तात्काळ निराकरण करणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यासोबतच बूथ सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यावरही विशेष भर देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधावा व शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

बूथ पातळीवरील संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने BLA-2 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. लोकजागर अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बळकटीसोबतच जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी भर दिला जात आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस .खोब्राजी पाटील नरवाडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष .विजयराव नरवाडे, पश्चिम मंडळ अध्यक्ष डॉ.अवधूत शिंदे, शिंदे पांगरा सर्कल प्रमुख गजानन वारे, विजय कडतन, डॉ.नागोराव जांबुतकर, देविदास शिंदे, शुभम शिंदे, दत्तराव अंभोरे, खंडेराव अंभोरे, प्रकाश अंभोरे, माधव अंभोरे,.नामदेव अंभोरे, विश्वनाथ नाईक, किशनराव शिंदे, परमाजी अंभोरे, सुनील राठी, दशरथ शिंदे, मनोहर शिंदे, .प्रभाकर शिंदे, विश्वनाथ शिंदे, आबाराव शिंदे, लक्ष्मणराव देशकर, हनुमंतराव शिंदे, ॲड.अरुण शिंदे, खंडेराव नाईक, दत्ताराव लेकुळे, अशोक पुंडगे, विठ्ठलराव लकुळे, गणेशराव, किशोर अंभोरे, नामदेवराव अंभोरे, पांडुरंग नवटके, सचिन लेकुळे, काळूराम कुरुडे, गोविंदराव शिंदे, मारुती पिंपरे,अमोल गायकवाड, दीपक जाधव, गोपाल किरवले,रवी पिंपरे, दिगंबर शिंदे, साहेबराव पिंपरे, पुरभा बागल, दिलीप होडगीर, चंपनराव होडगीर,गंगाप्रसाद देशमुख, सोमनाथ देशमुख, राजेंद्र देशमुख, 

.शिवदास देशमुख,शिवाजी शिंदे, मुरलीधर शिंदे, गजानन पपलवाड, पांडुरंग शिंदे, देविदास शिंदे, नागवराव शिंदे, देवराव शिंदे, प्रथमेश पतंगे, श्यामसुंदर शिंदे, प्रतापराव शिंदे, भागवत शिंदे, सुदर्शन शिंदे, भावडू शिंदे, गोविंद शिंदे, पिंटू आगासे, देवबा पोटे, विपुल शिंदे,रुपेश जाधव आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते