लोकजागर अभियान | वसमत विधानसभा – कवठा सर्कल

Mon 18-May-2026,10:04 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली वसमत येथील कवठा या बैठकीत सर्कलमधील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, BLA-2 तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान मतदार विशेष सखोल पुनर्रचना अर्थात SIR अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथवर मतदार यादी अद्ययावत राहावी, नवीन मतदारांची नोंदणी वेळेत व्हावी तसेच चुकीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच BLA-2 पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

बूथ हा पक्षाचा पाया आहे, या विचाराने प्रत्येक बूथ सक्षम व सुसंघटित करण्यासाठी लोकजागर अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार करत सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व उत्साही सहभाग नोंदवला.

जिल्हा सरचिटणीस खोब्राजी पाटील नरवाडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयराव नरवाडे, उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष .आदित्य देशपांडे, पश्चिम मंडळ अध्यक्ष डॉ.अवधूत शिंदे, .बालाजीराव जाधव, .गणेश कमळू, .विजय कडतन, .दौलत हुंबाड, .मारोती बुट्टे, .गजानन पप्पलवाड, .ज्ञानोबा काळे, मन की बात विधानसभा संयोजक .राजेश भालेराव, .लक्ष्मण बोराळा, .देविदास जटाळे, .भगवान खराटे, .सिताराम जाधव, .शिवशंकर खराटे, .प्रफुलकुमार जाधव, .नवनाथ जाधव, .माधव खराटे, .कमलाकर खराटे, .एस.डी.सरपाने, .नारायणराव दासे, .ज्ञानेश्वर भुतकर, .प्रकाश नरवाडे, .गोविंदराव शिंदे, .बळीराम हरबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.