“कायदा आहे… बंदी आहे… पण तरीही वर्ध्यात तंबाखू माफियांचा सुळसुळाट सुरूच!

Fri 15-May-2026,11:21 AM IST -07:00
Beach Activities

“कायदा आहे… बंदी आहे… पण तरीही वर्ध्यात तंबाखू माफियांचा सुळसुळाट सुरूच!

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा : वर्धा बापू आणि विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत आता गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा काळाबाजार फोफावल्याची जोरदार चर्चा! वर्धा शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे… आणि धक्कादायक बाब म्हणजे — हा संपूर्ण नेटवर्क अतिशय गुप्तपणे चालवलं जात असल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शहराबाहेरील सुनसान भागात कंटेनरमधून माल उतरवला जातो…

त्यानंतर हा माल छोट्या वाहनांमधून शहरात पोहोचवला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रश्न असा — इतक्या मोठ्या प्रमाणावर हा धंदा सुरू आहे… आणि प्रशासनाला याची माहिती नाही?

की मग कोणाचं तरी संरक्षण या काळाबाजाराला मिळत आहे?

महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही शहरात खुलेआम विक्री होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

वर्ध्यात तंबाखू माफियांचं जाळं एवढं मजबूत झालंय का… की कायदाच निष्प्रभ ठरतोय?”

नागरिकांमध्ये संताप वाढताना दिसतोय.

कारण तज्ज्ञांच्या मते, तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि व्यसनाधीनता वाढत आहे… आणि सर्वात धक्कादायक म्हणजे — तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या विळख्यात अडकत चालली आहे.

दरम्यान, या अवैध व्यवसायामागील काही मोठे चेहरे लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता सर्वसामान्य नागरिकांचा एकच सवाल 

“वर्ध्यात तंबाखू माफियांचं साम्राज्य नेमकं कोण चालवतंय?”

“या काळाबाजारामागे राजकीय आशीर्वाद आहे का?”

“की संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत?”

आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

वर्धा प्रशासन या गंभीर प्रकरणावर कठोर कारवाई करणार?

की तंबाखू माफियांचा हा काळाबाजार असाच सुरू राहणार?