प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यावर रामनगर पोलिसांचा धडक छापा : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : शहरातील अवैध गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका गुटखा विक्रेत्याला अटक केली आहे. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सिगारेट असा एकूण ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने मंगळवारी, आज १९ अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. यावेळी पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, वडगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळ राहणारा अजय कुमार हा आपल्या राहत्या घरात व घरालगतच्या पानटपरीवर शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवत आहे.
मिळालेल्या माहितीचा खातरजमा करून पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. घराची तसेच पानटपरीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटचा साठा आढळून आला. पंचनामा करून संपूर्ण माल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५ लाख ४८ हजार ९९२ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७५ तसेच कलम ३०(२)(अ), २६(२)(i), २६(२)(iv), अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ चे कलम २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवालदार आनंद खरात, रामप्रसाद नैताम, प्रकाश बलकी, शरद कुडे, जितेंद्र आकरे, महिला पोलीस हवालदार मनीषा, पोलीस शिपाई संदीप, प्रकाश मडावी, सुरेश कोरवार, रविकुमार, प्रफुल्ल व पंकज पोंदे यांनी केले.