प्रतिनिधी–पवन ढोके (माधेळी , वरोरा) ( महाराष्ट्र )
वडगाव येथील हरिदास तुराणकार यांच्या शेतामध्ये गाईवर धबा धरून बसलेल्या वाघाला बगायला गेले असता प्रफुल्ल असुटकार व शैलेश असुटकार यांच्या वर वाघांनी झेप घेतली असता शैलेश असुटकर यांनी नदी मध्ये उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाघाच्या तावडीतून बचावला,वाघाला बगताना वडगाव गावातील ,उपसरपंच प्रफुल्ल असुटकार, हरिदास तुरणकार, किरण तुरणकार,शंकर मडावी, पंडित गारघाटे, यांनि वाघाची दहशत प्रतक्षात अनुभवली आहे,,
सदर वाघ हा वेनावनदी च्या मार्गे वडगाव शिवारात आला असून हा वाघ बामर्दा शिवारात गेल्यामुळे बामर्दा गावातील लोकांनी सतर्क राहावे असे फॉरेस्ट विभागातील आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनि बामर्दा आणि वडगाव गावातील लोकांना इशारा दिला आहे, वाघ हा प्रतक्ष गावातील लोकांनी बगीतल्याने बामर्दा गावातील लोक वाघाच्या भीतीने भयभीत झाले आहे ,गावातील गुरे ढोरे वा कोणत्या मनुष्यावर वाघाचा हल्ला तर नाही होणारी अशी भीती निर्माण झाली आहे.
वाघाला लवकरात लवकर फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी जेरबंद करावे अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे,, गावातील नागरिकांनी फॉरेस्ट विभागाला विचारपूस केली असता आमी फॉरेस्ट विभागाची तुकडी बोलवून लवकरच वाघाला जेरबंद करू असे आश्वासन दिले आहे.