ठाणेगाव ग्रामपंचायतीची शिपाई पदाची परीक्षा रद्द करावी

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी
गडचिरोली:तालुक्यातील ठाणेगांव येथे ग्रामपंचायत मधील शिपाई भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करत ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच गट विकास अधिकारी आरमोरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की शिपाई वर्ग - ४ च्या पदाकरीता दिनांक १८ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा घेण्यात आली .एकूण १५ उमेदवारांनी परीक्षा दिली जिल्हा परिषद शाळा ठाणेगांव (जुना)व नवीन येथील मुख्याधपक यांच्या अधिनिस्त परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत अंगिका प्रकाश इनकने या परीक्षार्थीला लिहिता येत नसतांना देखील तिला १०० पैकी १०० गुण देण्यात आले यावरून घोळ झाला व ही परीक्षा रद्द करण्यात यावी व दोषी सरपंच व सचिव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली.निवेदन देतांना अमर नैताम,भारत चापडे,धनंजय मदनकर,अभिषेक कुनघाडकर,सतीश कुनघाडकर,राकेश मेश्राम,प्रतीक भुरसे,राधेश्याम बावणे,कुणाल भुरसे,आशिष नैताम,पिंटू बावणे,राकेश बावणे,शशिकांत चिचघरे उपस्थित होते