एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात स्केचिंग अँड रेंडरिंग विषयावर कार्यशाळा

Tue 23-Sep-2025,01:43 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर:एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे बी.ए. (फॅशन डिझाइन) व बी. वोक. (इंटिरिअर डिझाइन) अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींसाठी स्केचिंग अँड रेंडरिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध चित्रकार व दिलासाग्राम कॉन्व्हेंटचे कला अध्यापक सुनीत लोहकरे यांनी मार्गदर्शन केले.लोहकरे हे राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम चित्रकार असून त्यांच्या कलाकृतींना विदेशातही मोठी मागणी आहे. ते आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणेच्या युवा कला गौरव पुरस्काराचे मानकरी असून कला क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव आहे.कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिल्या सत्रात बी.ए. फॅशन डिझाइनच्या विद्यार्थिनींना स्टील लाईफ ड्रॉइंग, चेहऱ्याचे तपशीलवार वर्णन, हाताच्या हालचालींचे नियंत्रण आणि बारकावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या सत्राचे संचालन कुमारी श्रेया रंगारी यांनी केले व आभार प्रदर्शन करिष्मा नुनावत हिने मानले.दुसऱ्या सत्रात बी. वोक. इंटिरिअर डिझाइनच्या विद्यार्थिनींना रेखाचित्र, रूम व्ह्यू, शेडिंग तसेच विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कलेचे अनेक दृष्टीकोन शिकवले. या सत्राचे संचालन साक्षी पुणेकर हिने केले व आभार प्रदर्शन सबा खान हिने मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संचालक डॉ. राजेश इंगोले, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त तसेच सह प्राध्यापिका प्रणाली गौरकर यांचे मार्गदर्शन लाभले. फॅशन व इंटिरिअर डिझाइन विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनींनीही पूर्ण संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.