महेश ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर झेप

प्रतिनिधी आसिफ मलनस हिंगणघाट
हिंगणघाट, दि. २३-२४ सप्टेंबर २०२५ (मंगळवार व बुधवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने जय जवान अकॅडमी रिमडोह, हिंगणघाट येथे तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महेश ज्ञानपीठ च्या १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील दोन मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. कु. खुशी सुरकार (उंच उडी) कु. हर्षाली गावड (६००मीटर) तसेच दुसऱ्या दिवशी वयोगट १७ वर्ष मुले व मुलीमध्ये दमदार कामगिरी करत जिंकण्याची परंपरा कायम ठेवत मुलामध्ये कु. संकेत आंबटकर (३००० मीटर-चालणे), कु. स्वराली निमजे (१५०० मीटर-धावणे) कु. पूर्वा सुरकार (उंच उडी) विजय प्राप्त केला. या सर्व स्पर्धेकांनी वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबू राठी, सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ, उपप्राचार्य दिगंबर खटी, क्रीडा शिक्षक सचिन मुळे, पूनम नानवटकर आणि सर्व शिक्षकांना दिले.