खोब्रागडे ज्युनिअर कॉलेज वैरागड मध्ये आर्थिक साक्षरतेवर वेबिनार

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
वैरागड - येथील श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे एक्सेलन्स ग्लोबल स्किल दिल्ली यांच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागृतता व साक्षरता यावी याकरिता वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात आर्थिक बचतीची सवय लागून. कौटुंबिक गरजा भागविता याव्यात आणि जीवनात चांगली आर्थिक प्रगती साधता यावी या उद्दात हेतूने प्राचार्य डाँ. विवेक हलमारे यांनी स्मार्ट निवेशक जागृतता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी दिल्ली येथील एक्सेलन्स ग्लोबल स्किल या आर्थिक विषयावरील संस्थेच्या वतीने आशिष शहा आर्थिक नियोजन तज्ञ यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना बँक बचत, म्युच्यूल फंड, वीमा, शेअर मार्केट इ. विषयी माहिती देण्यात आली आणि आपले भविष्यात आर्थिक नियोजन कसे करावे याचे बारकावे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक साह्य व संचालन सहकार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रशेखर बर्वे यांनी केले. तर कार्यक्रमाला प्रा. प्रकाश म्हशाखेत्री, प्रा. नरेश लाडे, प्रा. मनीष राऊत, प्रा. अमोल नैताम, प्रा. कु. चांदेवार, प्रा. सरकार यांनी सुद्धा उपस्थिती लावून आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेतले. तर निखिल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी सदर वेबिनारला मोठ्या संख्येने हजेरी लावली.