न.प.गांधी विद्यालय, बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांचे अभिनय स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Sat 27-Sep-2025,10:08 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : नगर परिषद गांधी विद्यालय, बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करत पहिला क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे विद्यालयाच्या लोकनृत्य पथकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत कनिष्का चिकाटे, ईशा वासेकर, यशस्वी लोखंडे, अंकिता भगत, अनन्या कुतरमारे व अक्षरा सिडाम या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तर शिक्षिका श्रद्धा मुन, लता येरमे, उज्ज्वला येरमे व सौ. इंदिरा झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या विजयाबद्दल नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार तसेच मुख्याध्यापक सचिन कडुकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

विद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.