महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारे दोघे आरोपी अटक
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:दहेगाव गोसावी (ता. सेलू, जि. वर्धा) दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात काम करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रांची जबरी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी चंदा केशव पाटील (वय 48, रा. दहेगाव गोसावी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास शेतातून परत गावाकडे जात असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत सुमारे ₹40,000) हिसकावून पळून गेले.
त्यानंतर सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरील चारमंडळ शिवारात, त्याच इसमांनी मायाबाई चोखाजी चाटे (वय 65, रा. चारमंडळ) यांना रस्ता विचारत असताना त्यांच्या गळ्यातील अंदाजे 1.5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ₹15,000) हिसकावून पळ काढला.
या दोन घटनांमधील एकूण चोरीचा माल ₹55,000 इतका होता.
तक्रारीवरून पोलीस ठाणे दहेगाव गोसावी येथे गुन्हा क्रमांक 292/2025 कलम 304(1)(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी 1) रुपेश विनोद राठोड (वय 24) आणि 2) मुकेश विनोद राठोड (वय 26), दोघेही रा. मसाळा, ता. सेलू, जि. वर्धा या सख्या भावांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
1. 24 कॅरेट सोन्याचा 4 ग्रॅम रवा – ₹47,200
2. 24 कॅरेट सोन्याचा 1.5 ग्रॅम रवा – ₹17,700
3. काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्र. MH-32/AU-9546) – ₹1,00,000
4. ओपो कंपनीचा मोबाईल फोन – ₹10,000
5. घटनेवेळी परिधान केलेले कपडे – ₹600
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹1,75,500 एवढी आहे.
दोन्ही आरोपी सध्या दहेगाव गोसावी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन (ठाणेदार, दहेगाव गोसावी) यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार आनंद भस्मे, बम्हानंद मुन, भारत सातपुते आणि अनिल चिलगर यांनी केली.