उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील कर्मचारी यांची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई
प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट
हिंगणघाट:दी.05-11-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयातील अमलदार यांनी मा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक साहेब यांच्या मार्गदर्शनात गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी गोपाल नारायण वाटाणे, रा.सलोड (हिरापूर), ता.जि. वर्धा हा त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक MH 36 1670 ने मांडगाव ते वर्धा काळी रेती चोरी करून वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने, मांडगाव शिवार येथे नाकेबंदी दरम्यान आरोपी हा त्याचा ताब्यातील पांढऱ्या पिवळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक MH 36 1670 व दोन ब्रास काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून टिप्पर क्रमांक MH 36 1670 व दोन ब्रास काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 14,14,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला .सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा.अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशीलकुमार नायक सा. यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार सतीश घवघवे , पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.