वर्धा जिल्ह्याच्या कीर्तिस्तंभात भर! प्रथमेष खोडेने ज्युनिअर राज्य कुरश स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा: येथील जे. डी. चौधरी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेष किशोर खोडे याने इंडियन कुरश असोसिएशन आयोजित ज्युनिअर राज्य कुरश अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून वर्धा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.२७ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, प्रथमेषने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आणि +८३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले.
वर्धा जिल्हा कुरश असोसिएशनसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. प्रेरणास्रोत डॉ. जे. डी. चौधरी सर यांचे मोलाचे पाठबळ
प्रथमेषने आपल्या यशाचे श्रेय देताना सांगितले की, त्याला महाविद्यालयाचे सन्माननीय डॉ. जे. डी. चौधरी सर यांचा नेहमीच आधार लाभला. सरांनी त्याला आर्थिक मदत करून तसेच आगामी स्पर्धांसाठी नेहमी प्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. अशा प्रेरणादायी शिक्षकांचा आशीर्वाद लाभल्यानेच हे यश शक्य झाले, अशी भावना प्रथमेषने व्यक्त केली.
प्रथमेषच्या या यशात त्याचे प्रशिक्षक सुबोध दादा महाबुडे (मुख्य प्रशिक्षक) आणि स्मित श्रावणे व महावीर वारहरे (सहाय्यक प्रशिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रथमेषच्या या चमकदार कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्याचे हे यश जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायक ठरले आहे.