वर्ध्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा

Thu 01-Jan-2026,06:04 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठाण 

३१ डिसेंबरच्या रात्री ११ जणांवर गुन्हे दाखल; वाहने जप्त

वर्धा : वर्धा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध वर्धा पोलिसांनी कडक कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ११ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाहतूक शाखा वर्धा यांच्याकडून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दारू पिऊन वाहन न चालवण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख चौक व मार्गांवर नाकाबंदी लावून वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान काही चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. त्यानुसार मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या चालकांची नावे :

गजानन सिताराम चव्हाण (५२), लाडकी, ता. हिंगणघाट

रणधीर प्रभाकर रननवरे (५२), महावीर वॉर्ड, हिंगणघाट

आकाश चिंधुजी गुरनुले (३७), संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट

संजय चंद्रभान मडावी (३२), निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट

आशिष सुधाकर खेळकर (३८), आदर्श नगर, हिंगणघाट

राहुल प्रकाश जाधव (३५), रामनगर, जि. यवतमाळ

सागर रंगराव शेंद्रे (२३), गौरखेडा, आष्टी

आकाश धर्मेश आत्राम, अल्लीपूर

कुंदन दिलीप पेद्दाम, अल्लीपूर

आशिष दिनकर कोरडे, अल्लीपूर

इतर २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई

मद्यपी चालकांसह अतिवेगाने वाहन चालवणे, परवाना न बाळगणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे २०० वाहन चालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

“नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून, भविष्यातही अशाच प्रकारची कडक तपासणी सुरू राहील,” असे वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा वाहतूक शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.