रेल्वे स्टेशन बल्लारशहा येथे देशी दारूचा साठा जप्त
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपुर: रेल्वे स्टेशन बल्लारशहा येथील काजीपेट एन्ड आऊटर परिसरात रेल्वे पोलीसांकडून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून रेल्वे स्टेशन बल्लारशहा परिसरात रेल्वे पोलीस गुन्हेगार वॉच व गस्त घालत होते. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२५८९ चार्लापल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्मवरून काजीपेटकडे रवाना होत असताना, काजीपेट एन्ड आऊटर येथे एका अनोळखी इसमाने चालू ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी एक पिवळसर रंगाची रंगीबेरंगी प्लास्टिकची गोणी खाली टाकून पलायन केले.
सदर गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये रॉकेट देशी दारू असे लिहिलेले तीन खरड्याचे बॉक्स आढळून आले. त्यात ११ हजार ७६० रुपये किमतीच्या २९४ देशी दारूच्या बाटल्या आढळल्या असून ते जप्त करण्यात आले.
अज्ञात आरोपी विरुध्द रे. पो. स्टे. वर्धा येथे कलम ६५ (ए)(ई), ६६ (ब) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा चे ठाणेदार पंकज ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निलेश निकोडे, अखिलेश चौधरी यांनी केले.