दारु विक्रेत्यांवर अल्लिपूर पोलिसांची वॉशऑउट मोहीम,गुन्हात १३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट

Mon 12-Jan-2026,01:12 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील पोलिसांकडून वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली. कात्री, तळेगाव व अनेक परिसरामध्ये धाड टाकून पोलिसांनद्वारे कारवाई करण्यात आली.

अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले व पोलीस उपनिरीक्षक सुदाम सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात परिसरात धाड टाकून मोहा दारू विक्रेतांवर धडक कारवाई करण्यात आली. १३ लाख ७७ हजार रुपयाचा माल नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले पुलगाव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजयकुमार घुले, पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, सुदाम सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात जमादार अतुल लबाने, जमादार राहुल नव्हाते, जमादार अजय रिठे, जमादार राजेंद्र बेले, हवालदार रवि वर्मा, पोलीस शिपाई आकाश कुकडकर, गणेश किंनाके , अनुप नाईक यांनी केली.