अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात युवा दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय येथे दि 12 जानेवारी 2026 रोजी
स्वामी विवेकानंद यांच्या १६४ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन मूर्ती तर प्रमुख अतिथी पदी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.भूपेश मेंढे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. मेंढे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.मूर्ती यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचा "उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय प्राप्त होत नाही" हा मंत्र सांगितला, व तो जीवनामध्ये कशाप्रकारे अमलात आणायचा याबद्दल सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन डॉ. प्रवीण पाटील तर आभार प्रदर्शन व आयोजन प्रा.अविनाश ठाकरे यांनी केले.
सदर कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या आणि सहसंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला.
या सर्व कार्यक्रमासाठी विद्यार्थी प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.