हयातपाशा यात्रे निमित्त हयात नगर येथे भव्य कुस्तीचे आयोजन
प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
वसमत:-हायतनगर येथे रविवारी 18 जानेवारी 2026 रोजी हयातपाशा यात्रेचे अवचित्य साधून जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आहे होते या मैदानासाठी महाराष्ट्रातून शंभर हुन अधिक पैलवान शामिल झाले होते. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती सौकुनांनी मोठी गर्दी केली होती.या कुस्तीच्या मैदानाचा शुभारंभ हयातनगर चे सरपंच लक्ष्मण रामराव डोके आणि उपसरपंच नागनाथ गणपतराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू भैया नवघरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. मैदानातील सर्वात मानाची पहिली कुस्ती पैलवान गिरीराज दुबे आणि पैलवान राजू निळेकर यांच्यात झाली होती. दोन्ही पैलवानांनी तोडीस-तोड धुंदल्याने ही कुस्ती बरोबरीत सुटली या दोन्ही मनल्याने पहिला बक्षिसाचा मान पटकवला होता.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके व उपाध्यक्ष आयुकखान पठाण कोषाध्यक्ष रुस्तमराव राऊत सचिव ब्रह्माजी खाडे हयात नगर येथील सर्व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेतले होते.