विसापुर एसएनडीटी महाविद्यालय होणार नारी सक्षमीकरणाचे राष्ट्रीय मॉडेल-आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विसापुर (बल्लारपूर) येथील एसएनडीटी महिला महाविद्यालय नारी सक्षमीकरण, नवोपक्रम आणि स्वावलंबनाचे राष्ट्रीय मॉडेल केंद्र बनविण्याची दिशा ठरवली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर विश्वास व्यक्त केला.आमदार मुनगंटीवार यांनी महाविद्यालयाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेताना विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, स्मार्ट कॅम्पस, आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये डिजिटल शिक्षण प्रणाली, स्मार्ट क्लासरूम, महिला विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा सुविधा, आणि गेस्ट हाऊस यांचा समावेश आहे.महाविद्यालयाच्या विकासासाठी ५ हजार विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्याचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना दिल्या. एसएनडीटी महाविद्यालयाच्या बांधकामाची गुणवत्ता, वेळापत्रक आणि सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. भविष्यातील योजनांमध्ये अकॅडमिक बिल्डिंग, लायब्ररी, कॅफेटेरिया, हॉस्टेल, ऑडिटोरियम, इनडोअर स्पोर्ट्स बिल्डिंग आणि आकर्षक लँडस्केपिंगसह विविध इन्फ्रास्ट्रक्चर्स तयार करण्यात येणार आहेत.विसापुर परिसरातील महत्वाकांक्षी प्रकल्प -सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, क्रीडा स्टेडियम, कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प या परिसरात उभारले जात आहेत. यामध्ये २८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले कॅन्सर हॉस्पिटल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्स सेवेसाठी हेलिपॅड असलेले मेडिकल कॉलेज विशेष महत्वाचे ठरणार आहे.
ताडोबा पर्यटन विकास प्रकल्प -
ताडोबा पर्यटन विकासासाठी ३ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे ताडोबाला देशातील प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये स्थान मिळेल.