वर्ध्याच्या नालवाडीत अमानवी घटना; श्वानावर कार चढवणारा प्रकार CCTV मध्ये कैद

Mon 26-Jan-2026,11:59 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा | जिल्हा विशष प्रतिनिधि युसूफ पठाण

वर्धा शहरातील नालवाडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दि. 26 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका निर्दयी व बेफिकीर कारचालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या निरपराध श्वानावर जाणीवपूर्वक कार चढवली. ही धक्कादायक घटना परिसरात बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, सदर व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

प्राणीप्रेमी संघटना तसेच स्थानिक नागरिकांनी संबंधित कारचालकावर प्राणी संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषी वाहनचालकाची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.