सावंगी मेघे येथे ४१ रक्तदात्यांचे रक्तदान; मानवतेचा संदेश
मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा
सावंगी मेघे येथे ४१ रक्तदात्यांचे रक्तदान; मानवतेचा संदेश
सावंगी मेघे : प्रवीण पेठे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तसेच स्मृतीशेष प्रवीण बनसोड यांच्या स्मरणार्थ जनता जनार्दन बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सावंगी टी-पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यशस्वीपणे संपन्न झाले.
या रक्तदान शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. यामध्ये सिद्धार्थ राऊत, संजय मुडे, आनंद तलन, राजेंद्र गिरोलकर, विक्रम भांडवलकर, अमित सरगर, मनोज वैद्य, प्रथम सोंगे, सतीश माने, यश वंजारी, अनिकेत खोंडे, उमाकांत सोरटे, उल्हास कोठारी, गजानन हटवार, हर्ष बाभळे, शुभांगी पाटील, ललित धनवीज, प्रतीक दीघडे, संदीप दलाल, अमर पुरके, ललित कळंबे, जय महातवाणी, धम्मानंद थूल, मधुकर वाघमारे, मोहम्मद अजब, अमोल काटे, अमोल उचारे, दीपक बोरकर, प्रवीण उगेमुगे, प्रफुल्ल देशमुख, निलेश ठाकरे, नितेश नागोसे, रामभाऊ कदम, आशुतोष जुनगडे, चंद्रकांत गोटे, लॉरेन्स डॅनियल, वनिता मुनेश्वर, मिलिंद नाखले, विनोद लोहकरे, उज्वल गोहाने व कांचन मोडक यांचा समावेश होता.
शिबिराचे उद्घाटन अभ्युदय मेघे, मनोज चांदूरकर, मिलिंद जुनगडे, भीमा शंभरकर, प्रशांत जारोंडे, चेतना सवाई, वैशाली बनसोड, उमा इंगोले, शीतल बघेल, प्रवीण पेठे, रवी खेडकर, गौतम पाटील, धर्मपाल ताकसांडे, अशोक मौर्य, अशोक चौधरी व हर्ष कोठारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रक्तसंकलनासाठी एकनील ब्लड सेंटरच्या वैद्यकीय पथकाने काम पाहिले.
रक्तदात्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वॉटर बॉटल देऊन करण्यात आला. कार्यक्रमास शेखर शेंडे, सुधीर पांगुळ, महेंद्र मुनेश्वर, श्रीकांत दोड, विशाल मानकर, सुभाष खंडारे, द्वारका इडमवार, प्रकाश जिंदे, राजू वाघमारे, विजय नाखले, कृषक विद्यालयाचे कर्मचारी, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शरद वाघमारे, निखिल कुत्तरमारे, अमोल कुटे, भूषण तिडके, महेंद्र तेलंग, ललित धनवीज, कृष्णा नांदुरकर, गजानन पेटकर, प्रतिभा बोरघरे, प्रमोद खोडे, शीतल काकडे, विनोद तेलंग, प्रेमदास मोखाडे, सुशांत जीवतोडे, सुमित सुरजुसे व प्रिन्स बेंडले यांनी विशेष परिश्रम घेतले.