LCB चा छापा; ‘मटका किंग’सह ८ जण अटकेत, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त, परिसरात खळबळ

Sat 24-Jan-2026,06:49 AM IST -07:00
Beach Activities

LCB चा छापा; ‘मटका किंग’सह ८ जण अटकेत

८५ हजारांचा मुद्देमाल जप्त, परिसरात खळबळ

वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधि : युसूफ पठाण

वर्धा वर्धा शहरातील युवा कॉलनी परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या सट्टा-जुगाराच्या अड्ड्यावर वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘मटका किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य आरोपीसह एकूण ८ जणांना रंगेहात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व वाहन असा एकूण ८५ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२३ जानेवारी २०२६ रोजी रात्री युवा कॉलनीतील एका घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती LCB चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची परवानगी घेऊन विशेष पथक तयार करून छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी घरात वरली मटका खेळ सुरू असल्याचे आढळून आले.

या कारवाईत मुख्य आरोपी राणी राजेश यादव हिच्यासह चेतन ठाकूर, शिवदास पेंडोर, राकेश फुलकर, प्रफुल्ल ढगे, पंकज महाजन, मृदुल तुपत आणि पियुष राऊत (वय १९) यांना अटक करण्यात आली.

छाप्यादरम्यान पोलिसांनी ₹२०,०२० रोख रक्कम, ३ मोबाईल फोन, १ मोपेड तसेच सट्टा-पट्टीचे साहित्य असा एकूण ₹८५,०२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.