आरमोरी नगरपरिषद सुरू पथदिवे व वर लावलेली लायटिंग चारपाच दिवसातच पडले बंद

Tue 03-Feb-2026,09:22 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली:आरमोरी नगरपरिषद ने गणतंत्र दिनाच्या 26जानेवारी निमित्त अवचित साधत ब्रम्हपुरी -आरमोरी नागपूर टी पाॅईट हायवे वर असलेल्या पथदिवे वर तिरंगा लाईटींग ने रोषणाई करण्यात आलेली होती .सदरिल लायटींग संबंधित व हा प्रभाग जनतेला रोषणाई ने जनु आकर्षक निर्माण करणारा होती. दरम्यान प्रभाग क्रमांक आठ हा चर्चेत आला. आणि चारपाच दिवसातच संपुर्ण लाइटिंग बंद पडली. लाखो रुपये खर्च करून लावलेली तिरंगा लायटिंग बंद पडली. यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर व रोष निर्माण होत आहे.करिता लवकरात लवकर वडसा - ब्रम्हपुरी व्हाया नागपूर टी पाॅईंट वरील तिरंगा लायटिंग सुरू करण्यात यावी.अन्यथा‌ नगरसेवक तथा गटनेते मानिक भोयर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाव आठ मधिल नागरिक आंदोलन करतील.याची संबंधित नगरपरिषद विभागाने नोंद घ्यावी.असा इशारा देण्यात आला आहे.

तरी संबंधित तिरंगा लायटिंग दुरुस्ती करुन व पथदिवे सुरळीत सुरू ठेवावे .अशी मागणी नगरपरिषद गटनेते तथा नगरसेवक माणिक भोयर यांनी केली.