वर्ध्याच्या भर गर्दीच्या भागात चेन स्नॅचिंग; बापूंच्या नगरीत चोरट्यांचे पोलिसांना उघड आव्हान
वर्ध्याच्या भर गर्दीच्या भागात चेन स्नॅचिंग; बापूंच्या नगरीत चोरट्यांचे पोलिसांना उघड आव्हान
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा वर्धा शहरात चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील महादेवपूरा या भर गर्दीच्या परिसरात रात्री सुमारे ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून पळ काढल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा-सव्वा तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन, म्हणजेच एकूण सुमारे अडीच तोळे सोन्याच्या चेन गळ्यातून हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापूंच्या नगरीत अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
वर्धा पोलीस कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जात असले तरी भर गर्दीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वी नागपूर, मुंबईसारख्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना ऐकायला मिळत होत्या. मात्र आता अशा घटना वर्धा जिल्ह्यातही घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांनी पोलिसांनी या प्रकारावर तात्काळ अंकुश ठेवून विशेष पथक स्थापन करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे