वर्ध्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार जोरात; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत असा काळाबाजार!
वर्ध्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार जोरात; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : वर्धा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा शहरातच सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित गुटख्याचा अवैध व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतरही हा धंदा बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा
माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच काही ठिकाणी सुगंधित तंबाखूची उघड विक्री सुरू असून, बाहेरून माल आणून वेगवेगळ्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात विकला जात आहे.
गुटखा बंदी असतानाही खुलेआम विक्री
मध्यप्रदेश-गुजरातहून माल पुरवठा ?
दुचाकीवरून घरपोच डिलिव्हरी
रोज लाखोंची उलाढाल असल्याची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील काही सुनसान भागांमध्ये कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात तंबाखूचा माल उतरवला जातो आणि नंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जात असल्याची चर्चा आहे.
यामुळे या अवैध धंद्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित कडक कारवाई होत नसल्याने गुटखा माफिया बेधडक झाले आहेत.
आरोग्याचा वाढता धोका
तज्ज्ञांच्या मते, तंबाखू व गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असून, *विशेषतः तरुण पिढी याच्या विळख्यात अडकत आहे*
नागरिकांची मागणी अवैध गुटखा व तंबाखू विक्रीवर तात्काळ मोठी कारवाई करून कायमस्वरूपी बंदीसाठी विशेष मोहीम राबवावी
प्रश्न कायम — गांधी-विनोबांच्या भूमीत सुरू असलेला हा काळाबाजार प्रशासन कधी थांबवणार?