आदर्श बिगरशेती पत संस्थेत अध्यक्ष ब्रजभुषण बैस व उपाध्यक्ष कैलाश गजभिये यांची निर्विरोध निवड
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा -सालेकसा येथे 2004 ला स्थापन झालेली सालेकसा आदर्श ग्रामीण बिगरशेती पत संस्था सालेकसा येथे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी एक संजय गायधने यांच्या उपस्थितीत व देखरेख खाली नव्याने संचालक मंडळाची निवडणूक पार पडली असून सात सदस्यांची निर्विरोध निवड करण्यात आली व यामधुन सर्वानुमते संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून ब्रजभुषण बैस व उपाध्यक्ष कैलाश गजभिये यांची निर्विरोध निवड झाली तसेच सदस्य मुरलीधर कावळे,विजय फुंडे, नुरसिह हरीणखेडे,अनिल अग्रवाल,अनिता चुटे यांची नियुक्ती झाली. यावेळी संस्थेचे कर्मचारी महेंद्र बहेकार , दुर्गा अंबादे,रमेश चुटे, बाजीराव तरोने,वर्षा चौरे , मोनु गजभिये ,सीमा बैस यांची उपस्थिती असून नविन संचालक मंडळाला शुभेच्छा देण्यात आल्या.
Related News
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आसिफ खान यांचे “कफन-दफन” प्रतिकात्मक आंदोलन
21-Oct-2025 | Sajid Pathan
वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट निर्धारित वेळेत सुरू करण्याबाबत निखिल सातपुते यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
16-Oct-2025 | Sajid Pathan
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम आणि स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन
09-Oct-2025 | Sajid Pathan
पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा 45 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
03-Oct-2025 | Sajid Pathan