तरुणाने माकडाचा जीव वाचवला

सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर चे रहिवासी असलेले कुणाल कोलोडे यांनी माकडाचे बाळ वाचवून जीवदान दिले. कुणाल आपल्या घरी जात असताना इंदिरा गांधी शाळेजवळ कुत्र्यांचा जमाव एका माकडाची शिकार करताना दिसला. कुणालने तात्काळ तेथे पोहोचून माकडाचे बाळ कुत्र्यांपासून वाचवले आणि त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले, तेथे डॉ. पुरुषोत्तम बोबडे यांनी माकडाच्या बाळावर उपचार केले.
कुणाल कलोडे यांनी वर्धाचे आरएफओ रूपेश खेडेकर यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी राऊंड ऑफिसर राजेश सयाम यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर माकडाच्या बाळाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या सतर्कतेमुळे माकडाच्या पिल्लाचा जीव वाचला.
उन्हाळ्यात जंगलातील फळे आनी फुले नसल्यामुळे माकडांचे कळप वस्तीकडे वळतात, अशा स्थितीत वस्तीतील कुत्रे माकडांवर हल्ला करून त्यांना जखमी करतात. तर अनेक वेळा कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडांना जीवही गमवावा लागतो.