सेवा ज्येष्ठता यादी डावलून मुख्याध्यापक पदी नयुक्ती व शिक्षक भरतीतील भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी - कैलाश बगमारे

Mon 05-May-2025,05:16 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:साईनाथ अद्दलवार (मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी) यांची सेवा जेष्ठता यादी डावलुन मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी दिनांक २ मे २०१२ नंतर केलेल्या शिक्षक / शिक्षिका भरती मध्ये केलेला भोंगळ कारभार तसेच अवैध मार्गाने जमा केलेल्या संपत्तीची तात्काळ चौकशी करावी व चौकशी अंतीदोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत.सध्या राज्यामध्ये गाजत असलेला बोगस अल्पसंख्याक, बोगस शालार्थ आयडी,बोगस शिक्षक भरती घोटाळा यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मध्ये मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालीत महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी व महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी या दोन विद्याशाखा कार्यरत आहेत. ह्यापैकी महात्मा गांधी उच्च विद्यालयात साईनाथ अद्दलवार यांची १५ जुलै २००६ रोजी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली. सन २०११ मध्ये महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत असणार्‍या व्यक्ती बद्दल नाहक गैरसमज निर्माण करून संस्थेप्रती असंतोष निर्माण करण्याचे काम अद्दलवार यांनी करून संबंधित व्यक्तीस मुख्याध्यापक पदावरून हटविण्यात यश प्राप्त केले.हे केवळ स्वतः मुख्याध्यापक पदी रुजू होण्यासाठी षड्यंत्र रचल्याचे सर्व कर्मचाऱ्यांना दिसून आले आणि श्री साईनाथ अद्दलवार हे शिक्षण सेवकाचा कालावधी घेऊन अवघ्या ५,१/२ वर्षातच दिनांक १ डिसेंबर २०११ ला मुख्याध्यापक पदी रुजू झाले. आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कडून तात्काळ मान्यता ही मिळवून घेतली त्यावेळी सेवाजेष्ठता यादी, बिंदूनामावली किंवा जातप्रवर्ग ह्या बाबींचा कोणताही विचार करण्यात आला नाही, कदाचित मुळ कागदपत्रावखोडताड करूनही केवळ ह्या व्यक्तिकरीता संस्थेने हे पाऊल उचलले असु शकते हे नाकारता येत नाही.या बाबतीत संस्थेचे पदाधिकारी जेष्ठ शिक्षकांचे काही ऐकुण घ्यायला तयार नव्हते तोंडी किंवा लेखी तक्रार ही दबाव निर्माण करून इतरांना दडपण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सुमारे १५ ते १६ ज्येष्ठ शिक्षकांना हक्क नाक स्वतःहक्का पासुन वंचित राहावे लागले. नाईलाजाने २७-२८ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अधिनस्त राहून सेवा करावी लागली किंवा काहींना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.अशा प्रकारे संस्थां आणि मुख्याध्यापक यांनी विद्याशाखेत दुषित वातावरण निर्माण केले आणि सर्व कर्मचारी त्यांचे बळी ठरले.अद्दलवार यांनी पदाचा दुरुपयोग करून आणि सर्वांना मुक्कामार देऊन पुर्ण कर्मचारी हतबल करण्याचे धाडस यांचे कडून होत असे. कोणताही कर्मचारी संस्थेपर्यंत पोहोचण्यास देखील पाबंदी घालण्यात आली त्यामुळे विद्याशाखा वरपांगी निर्दोष दिसत असली तरी आतील दहशत व आर्थिक लूट ह्या बाबी संस्थेला जराही माहीत होत नसत.हे अनेक कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांच्या मार्फत जीवघेणी माहिती उपलब्ध झाली. केवळ ह्या एका व्यक्तीमुळे अनेक ज्येष्ठ शिक्षक पदोन्नती पासुन शेवटपर्यंत वंचितच राहिलेसाईनाथ अद्दलवार हे एवढ्यात न थांबता त्यांनी पुर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया,चंद्रपूर,भंडारा ह्या जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा वगळून इतर माध्यमिक शाळां मध्ये दिनांक २ मे २०१२ पासुन राज्यामध्ये शिक्षक भरती बंद असताना विविध शाळां मध्ये आपल्या नावाचे अस्तित्व दाखवून थेट मंत्रालयांमधुन शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथून बनावट कागदपत्राद्वारे त्यांचे व्यक्तिगत शालार्थ आयडी माननीय शिक्षणाधिकारी यांच्या मान्यता मिळवून देण्याची काम यांनी केलेले आहे. चक्क यांनी आपल्या शाळेमध्ये १८ ते २० शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अद्दलवार यांनी शासनाला करोडो रुपयाचा चुना लावुन अल्पावधीमध्येच बेकायदेशीर करोडोची माया जमविल्याचे  खात्रीशिर आहे.संस्थेअंतर्गत चालणाऱ्या विद्याशाखेतील विद्यार्थीसंख्या अभावी संचमान्यतेनुसार नियमीत शिक्षकांचे समायोजन बाहेरच्या शाळेत करत असायचे तर शिक्षणाधिकारी यांनी इतर शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्याचे आदेश देऊन सुद्धा संबंधित शिक्षकाला रुजू करून न घेता काही दिवसानंतर जाहिरात देऊन नवीन शिक्षकांची भरती केली गेली.सन २०१२ पासुन आजपर्यंतची ऑनलाईन संचमान्यता, बिंदू नियमावली, जातप्रवर्ग तसेच दरवर्षीची मान्यताप्राप्त सेवा जेष्ठता यादी तपासणी गरजेचे असतांना या मुख्याध्यापकांने गडचिरोली, नागपूर, मंत्रालय, शिक्षण संचालक पुणे येथे थेट प्रवास करून या शिक्षक भरती घोटाळ्याचे पारेमुरे खोलवर उजविण्याची काम यांनी केली आहे तरी पण संबंधित व्यक्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत त्यांची स्थावर मालमत्तेसह व या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी.चौकशीअंती प्रसाशन किवा राजकीय दबावाला बळी न पडता सबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा