पोलीस पथका कडुन विदेशी व देशी दारूचा 93,600 रू चा. माल जप्त

अरबाज पठाण ( सिंधी रेल्वे )
पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 12/05/2025 रोजी खास मुखबिर कडुन मिळालेल्या खबरे वरून परसोडी रस्त्यावर असलेल्या उड्डाण पुलावर नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे शारीक शहा रहमान शहा वय 38 वर्ष रा. लादेन नगर सिंदी रेल्वे याचे ताब्यातुन 1) एक निळ्या रंगाची टि.वी.एस. ज्युपिटर कंपनिची मोपेड गाडी क्र. एम.एच. 40/सि.पी/5214 किंमत 60,000रू 2) गाडीचे पायदानावर एक खर्रडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या ऑफीसर चॉईस (ओ.सी) कंपनिच्या विदेशी दारूने भरून असलेल्या एकुण 48 शिश्या प्रति नग 250रू प्रमाणे 12000रू 3) तिन खर्रडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या लावणी संत्रा कंपनिच्या देशी दारूने भरून असलेल्या एकुण 144 शिश्या प्रति नग 150 रू प्रमाणे 21600रू असा एकुण जुमला किंमत 93,600रू चा माल वाहतुक करीत असतांणा मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपुर्ण माल जप्त करून आरोपी क्र. 1) शारीक शहा रहमान शहा वय 38 वर्ष रा. लादेन नगर सिंदी रेल्वे 2) गौरव दिक्षीत रा. सिंदी रेल्वे याचे विरूध्द अपराध क्रमांक 122/2025 कलम 65 अ.ई. 77 अ. 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 130/177, 3 (1), 177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा,प्रमोद मकेश्वर याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे पोलीस निरिक्षक नरेन्द्र निस्वादे ठाणेदार पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार आनंद भस्मे, प्रफुल डफ, कैलास हरणे पो.शि. कांचन चाफले, उमेश खामनकर, समीर आगे सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे