रस्त्यांच्या प्रलंबित कामांवर विशेष चर्चा – खासदार अमर काळे यांची भेट

सुनिल हिंगे, अल्लीपूर
शासकीय विश्रामगृह वर्धा येथे खासदार अमर काळे यांची भेट घेऊन अल्लीपूर आणि भोजनखेडा परिसरातील पायाभूत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेषतः अल्लीपूर-भोजनखेडा रोडवरील पुलाच्या स्थिती आणि रस्त्यांच्या दुरुस्तीविषयी निवेदन देण्यात आले.
यावेळी स्थानिक विकास निधीतून सुरू असलेल्या दोन रस्त्यांबाबत – फटिंग पेट्रोल पंप ते सचिन वरघणे आणि पाण्याची टाकी ते जिजाबाई गुजरकर – केलेल्या कामांसाठी आभार व्यक्त करण्यात आले.
उपस्थित पदाधिकारी:
▪️ संदीप किटे – प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
▪️ प्रणय कदम – जिल्हाध्यक्ष
▪️ सचिन पारसडे – जिल्हा कार्याध्यक्ष
▪️ अतुल जयपूरकर, आशिष लोणारे, रामा ढेंगरे, पंकज उरकुडे
या भेटीत स्थानिक समस्या आणि विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. पुढील काळात प्रस्तावित विकास योजनांवर लक्ष केंद्रीत करून पाठपुरावा केला जाईल, असेही सांगण्यात आले.