शेतात वीज पडून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

प्रतिनिधी – सुनिल हिंगे, अल्लीपूर
देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील सोनेगाव स्टेशन येथे रविवारी सकाळी वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला. ही घटना शेतकरी प्रवीण शंकर पवार यांच्या शेतात घडली. घटनास्थळी बैल बांधून ठेवण्यात आला होता, त्याचवेळी आकाशातून वीज कोसळली आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी पवार यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण हंगामाच्या शेती कामांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी अंकुश धुर्वे, पोलीस पाटील मनीष मून आणि कोतवाल संदीप सुरकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती सानुग्रह निधी अंतर्गत योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे, जेणेकरून नुकसान भरून निघू शकेल आणि शेती कामांवर परिणाम होणार नाही.
Related News
नगर पंचायतीवर माहिती अधिकाराच्या पायमल्लीचा आरोप,अर्जदाराची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
26-Aug-2025 | Sajid Pathan