हर घर तिरंगा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदेची तिरंगा बाईक रॅली उत्साहात.

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद बल्लारपूरतर्फे २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज ११ ऑगस्ट रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयातून रॅलीला प्रारंभ झाला. रॅली नवीन बस स्थानक, जुना बस स्थानक मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे संपन्न झाली. या रॅलीत नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमाचे नेतृत्व प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले. त्यांच्यासह उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी,संगीता उमरे, साठा विभाग अधिकारी उपेंद्र धामणगे, कर अधिकारी गजानन आत्राम, नगर अभियंता डॉली मदन,बांधकाम अभियंता मयूर दहीकर, कृष्णा गुल्हाने,पाणी पुरवठा उप अभियंता प्रशांत गणवीर,आरोग्य निरीक्षक भूषण साळवटकर,मयुरी भोयर तसेच सर्व लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.१२ ऑगस्ट रोजी पेपरमील काटा चौक ते नवीन बस स्थानक मार्गे परत नगर परिषद कार्यालय येथे तिरंगा दौड (मॅराथॉन) सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.