पाली बुद्ध विहारात संविधान आणि धम्म विषयक मार्गदर्शन

Wed 20-Aug-2025,10:35 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर वर जिल्हा पश्चिम शाखा, बल्लारपूर यांच्या तर्फे पाली बुद्ध विहार, विद्यानगर वार्ड येथे संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा राज्य संघटक अशोक घोटेकर, जिल्हा संस्कार विभाग सचिव शेषराव सहारे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी संविधान आणि धम्म या दोन्हींचे नाते स्पष्ट करताना, संविधान आणि धम्म हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका पंचशीला वेले यांनी केले. प्रस्तावना बल्लारपूर तालुका अध्यक्ष अँड रमन पुणेकर यांनी केली.तसेच शहर अध्यक्षा गायत्री रामटेके यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपासिका सहभागी झाल्या. कार्यक्रमाचा समारोप सरनत्य घेऊन करण्यात आला.