गोरखनाथ वाई येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न

Sun 24-Aug-2025,03:29 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेकडो बैल जोड्या वाई गोरखनाथ येथे दर्शनासाठी येत असतात. व इतर जिल्ह्यातील बैल जोड्या दर्शनासाठी आल्या असता . या वेळी गोरखनाथ वाई कमिटीने त्यांचे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी त्यांचे भव्य असे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.बोखारे पांगरा येथील सरपंच सत्यनारायण बोखारे यांनी दूध व चहाचे आयोजन केले होते. शेकडो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला.तालुक्यातील मौजे गोरखनाथ वाई येथे आज भव्य असा पोळा सण साजरा करण्यात आला यामध्ये सर्व वसमत तालुक्यातील व शहरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने बैल जोड्या घेऊन गोरखनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात यामध्ये दिनांक 22 रोजी रात्री बारा ते दिनांक 23 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या दर्शनाचा लाभ सर्व शेतकरी बांधव घेत असतात.