अल्लिपुर येथे नंदी सजावट स्पर्धेत बक्षीस, भेटवस्तू,खाऊ सह लयलुट

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे जन युवा मंच चे वतीने आठवडी बाजार येथे तान्हा पोळा निमित्ताने नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अ गट मोठे मिरवणूक नंदी व ब गट लहान नंदी अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली.उद्घाटन,बक्षीस वितरण कार्यक्रमाला सर्व महिलांनाच निमंत्रित करण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळे महत्त्व व कौतुकास्पद कार्यक्रम ठरला.गेल्या चौदा वषाॅपासुन हा उपक्रम सुरू आहेत.कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अनु फटींग, डॉ.हषाली भलमे,प्राचार्या अर्चना मुडे,सुनिता लिचडे, संगिता भलमे,मंदा पारसडे, मोनाली चंदखेडे, psi वषाॅ तांदुळकर ,मयुरी कोंडुस्कर यांचे हस्ते करण्यात आले. ब गटात रेवांश नरड,आयुष्य साखरकर,कोनाक्र लिचडे, रूचिका सुरकार, नक्ष सुरकार,तोषित वांदिले, शौर्या भट, वेदांत नरड लावण्या सुरकार,रूद्र साखरकर,पाखि लांबट. प्रोत्साहन पर मनस्वी निखिल खाडे,पुवाॅ सुरकार,सार्थक वांढरे,प्रित गोठे,ओवी वानखेडे,आरीफखा पठाण यांना बक्षीस,भेट वस्तू,टाॅफी, प्रमाणपत्र देण्यात आले.अ गटात - मोठे नंदी.नंदी सजावट मध्ये - प्रशांत चंदनखेडे, आशिष डफ, वेशभूषा - आर टी.एम.स्पोटींग क्लब, हार्दिक ढगे, सामाजिक संदेश - शेतकरी मित्र परिवार देखावा - सचिन पारसडे, आशिष साखरकर महाराष्ट्र संस्कृती - शंकर महाराज घुसे, गुरूदेव सेवा मंडळ (सुरकार) या नंदीला बक्षीस, व दोन भेट वस्तू प्रमाणपत्र देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सेलकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन युवा मंच चे अध्यक्ष योगेश वरभे अध्यक्षीय भाषण अनु फटींग आभार प्रदर्शन गोपाल गिरडे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रफुल्ल गोठे,दशरथ पेटकर, रामचंद्र बाळबुधे,माधव ढगे, कैलास पिंपळापुरे, नितीन चंदनखेडे,सतिश चंदनखेडे,राजु रेंढे, अरविंद साखरकर,राजु कामलकर,प्रितम वरघणे, युसुफ कुरेशी यांनी परीश्रम घेतले.