मुंडीपार येथील साखळी उपोषण सुरूच

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत सालेकसा तालुक्यातील मुंडी पार पानगाव गट ग्रामपंचायत येथे मागील दिनांक 5 सप्टेंबर 2025 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य हरीश नागपूरे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे मात्र आतापर्यंत साधी चौकशीही करण्यात आले नाही विशेष म्हणजे तत्कालीन ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सरपंच यांच्यासोबत संगणमत करून 14 वा वित्त आयोग व 15,वा वित्त आयोग यामध्ये अवैधरित्या पैशाची अपरातफरी करून आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे ते अजूनही मोकाट फिरत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टचारामध्ये लिप्त असतील असा आरोप ही केला जात आहे सविस्तर वृत्त असे की अवैध बांधकाम व सरपंच यांचे अवैध अतिक्रमण त्याचप्रमाणे कार्यारंभ आदेश नसतानाही कामाची सुरुवात करणे बोगस काम करून घेणे व केलेल्या कामाचे आतापर्यंत साधा बोर्ड नाही यांच्यासह विविध विषयी असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप हरीश नागपुरे यांच्याकडून केला जात आहे. तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांची बदली मोरगाव अर्जुनी तालुक्यात झाली तर एक देवरी पंचायत समिती येथे कार्यरत असल्याची माहिती आहे एकीकडे जिल्हा प्रशासन म्हणतो की भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारांनाच पाठबळ देत असल्याचेही चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. यावरून असे दिसते की अधिकारीच मुजोर झाले असून मोठे अधिकारी भ्रष्टाचारात सामील असतील असाही अंदाज बांधला जात आहे,सदर साखळी उपोषणाला बसलेले ग्रामपंचायत सदस्य हरीश नागपुरे, उमेश बसोने,उमादेवी नागपुरे, अनंदा जमदाळ,यांनी साखळी उपाषण सुरूवात केले आहे सदर साखळी उपोषणाला भेटीदरम्यान पंचायत समिती सभापती विना कटरे जितेंद्र बल्हारे उपसभापती, गटविकास अधिकारी संजय पुरी सहाय्यक गट विकास अधिकारी एम एल वासनिक पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अंकित अग्रवाल कृषी विस्तार अधिकारी के.के.तिराले, घनश्याम नागपुरे यांनी भेट दिल.
- बॉक्स
प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे करिता लाख रुपये नवीन आवार भिंत करिता पैसे मंजूर झाले होते व बांधकाम करण्यात यावे असा ठरावही ग्रामपंचायत कडून करण्यात आला होता परंतु सरपंच यांनी जुनीच आवार भिंत दाखवून पैसे विड्राल केले व टाइल्स सुद्धा लावले नाही व आजही काम पूर्णपणे अर्धवटच आहे सरपंच आपले हिटलर साही चालवून हुकुमशाही सुद्धा चालवत आहे व गेल्या चार ते पाच महिन्यापासून जिल्हा परिषद शाळेत टाइल्स पडून आहेत मात्र बिल काढण्यात आले आहे मुंडीपार अंतर्गत इस्टिमेटच्यानुसार काम केले जात नाही असा आरोप साखळी उपोषण करते व ग्रामपंचायत सदस्यचा आरोप आहे.
- प्रतिक्रिया
याविषयी सविस्तर माहिती घेतली असता साखळी उपसंदर्भात मला माहिती नाही व मी सध्या गेल्या दोन दिवसापासून मुंबईला असल्याने जिल्हापरिषद ला येऊ शकलो नाही तरीपण संबंधित तक्रार जिल्हा परिषद व पंचायत समितीला, पत्रव्यवहार झाले असेल तर नक्कीच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी भ्रष्टाचार केले असेल तर चौकशी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- लाईकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिय
- प्रतिक्रिया
या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता जिल्हा परिषद शाळे कडून कसल्याही प्रकारची काम सुरू करताना आम्हाला विश्वासात किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही आमच्या शाळेत टाइल्स गेल्या अनेक महिन्यापासून पडून आहे आवार भिंतीचे कामही अर्धवट ठेवले आहे.
के,डी नवगोडे तत्कालीन मुख्याध्यापक वरिष्ठ प्राथमिक जिल्हा परिषद शाळा मुंडीपार
- प्रतिक्रिया
या संदर्भात प्रत्यक्षात अधिक माहिती घेतली असता ग्रामपंचायत मुंडीपार येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी 15 वित्त आयोगात भ्रष्टाचार केला असेल तर नक्कीच नियमानुसार कारवाई करून दोषी सरपंच यांची सविस्तर चौकशी करावी.
- विना कटरे सभापती पंचायत समिती सालेकसा
- प्रतिक्रिया
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता ग्रामपंचायत मुंडी पार मध्ये यापूर्वीचे ग्रामसेवक यांनी व विद्यमान सरपंच यांची सविस्तर चौकशी व्हावी व बोगस शौचालय 15 वित्त आयोगाचा निधी कुठे गेला याविषयी संपूर्ण चौकशी करावी दोशी आहोतआढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
- जितेंद्र बल्हारे उपसभापती पंचायत समिती सालेकसा
- प्रतिक्रिया
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता तत्कालीन ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे परत पुन्हा सविस्तर चौकशी केली जाईल व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर नियमानुसार ती रक्कम वसूल करून कारवाई करण्यात येईल.
- संजय पुरी गटविकास अधिकारी पंचायत समिती सालेकसा