पोहना सर्कल अंधारात – शिवसेनेचा इशारा : वीज द्या नाहीतर आंदोलन पेटेल

प्रतिनिधी मंगेश लोखंडे हिंगणघाट
पोहना :गेल्या दोन आठवड्यांपासून पोहना सर्कलमध्ये सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार वीज जाण्यामुळे घरगुती कामकाज ठप्प, विद्यार्थ्यांचा अभ्यास बिघडला, तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.
या तीव्र समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोहना सर्कल शिवसेना तर्फे वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. “त्वरीत स्थिर व अखंड वीजपुरवठा सुरू करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल” असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावेळी ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये तालुका उपाध्यक्ष वैभव ढगले, जि.प.सर्कल प्रमुख अनिल ढगले, शंकर जाधव, निखील नांदेकर, मुकेश ढगले, संघर्ष तिजारे, महेश पुस्नाके, शुभम बोरकर,विशाल देऊळकर, रोहन विरुळकर, रामू बोरकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
👉 नागरिकांचा संताप वाढत असून, जर तातडीने तोडगा निघाला नाही तर पोहना सर्कल आंदोलनाच्या रणांगणात पेटण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत