बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा.कमलनारायण उईके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला
वरूड:भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवार २५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सत्रात वरूड शहर मंडळा तर्फे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या कार्यालयात सेवा पंधरवडा व पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त त्यांच्या प्रतीमेचे पुजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आ. उमेश यावलकर यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, सरचिटणीस सुमित पवार, संतनु देशमुख, कोषाध्यक्ष राम जोशी, उपाध्यक्ष श्रिकांत मांडवे, किसान आघाडी उपाध्यक्ष राजेश नवघरे, उपाध्यक्ष अमित बाभुळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वरूड मोर्शी तालुक्यातील सर्व सेलचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिनदयाळ उपाध्याय यांच्या जिवनचारीत्र्यावर आ.उमेश यावलकर , तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, माजी शहराध्यक्ष योगेश्वर खासबागे यांनी प्रकाश टाकला. तसेच सेवा पंधरवडा याविषयावर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांनी संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यासह आमदार उमेश यावलकर व रविराज देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी प्रा. कमलनारायण उईके यांनी बोलताना म्हटले की, शाहु, फुले, आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा समोर नेत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या अधिक बळकटीकरणासाठी आणि आदिवासी बांधवांच्या सशक्तीकरणासाठी भाजपामध्ये माझासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. पुढे पक्षाच्या वतीने जी जबाबदारी दिल्या जाईल त्या जबाबदारीला न्याय देण्याचे काम आम्ही नक्की करू, जिल्ह्यातील १४ पैकी सात तालुक्यांमध्ये आदिवासी बहुल भाग आहे. त्या भागातील आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही भाजपा नेत्यांच्या सहकार्याने पुर्ण यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे. यावेळी त्यांच्या सोबत झटामझिरी ग्रामपंचायत सरपंच तथा कृ.उ.बा.स.संचालक हिराकांत उईके, सीमा उईके, तालुका कोषाध्यक्ष नितेश उईके, लालु युवनाते, राज उईके, महादेव कवडे, बलीराम सलामे, संजय परतेती, संजय युवनाते, सचिन कुमरे, गजानन धुर्वे, गजानन सलामे, गजानन आपकाजे, प्रविण लांजेवार अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.