निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडला कोरची येथील धडक मोर्चा

Thu 25-Sep-2025,09:20 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

कोरची:विविध मागणीला घेऊन नगरपंचायत कोरची च्या विरोधात तहसील कार्यालय कोरची येथे 24 तारखेला धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु यामध्ये काही लोक दिशाभूल करण्याकरिता हा मोर्चा काढत असल्याचे निदर्शनास येताच कोरची नगरातील बहुतेक नागरिकांनी या मोर्चाला आपली पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.

             महत्त्वाचे म्हणजे साधारणतः सुमारे 4000 ते 4500 लोकसंख्या असलेल्या कोरची नगरातील 80 ते 85 नागरिकांची या धडक मोर्चामध्ये उपस्थिती होती. शासनाकडून दरवर्षी नगरपंचायत ला कोट्यवधी रुपये निधी येत असल्याची खोटी माहिती या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेली होती परंतु यावर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून नगरपंचायत ला आलेला नाही असे आरोप नगरपंचायतने फेटाळून लावलेले आहेत.

            2021 ला वार्ड क्रमांक 8 मध्ये एका दगडाच्या विहिरीचे संपूर्ण नव्याने बांधकाम करण्यात आले असून सदर बांधकाम हे व्यवस्थितपणे करण्यात आलेले आहे आणि अंदाजपत्रक आणि नियमानुसारच बांधकाम झालेले असून या विहिरीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही अशी माहिती नगरपंचायत कोरची तर्फे देण्यात आलेली आहे.

         मागील काही दिवसांपासून कोरची नगरातील जनतेची दिशाभूल करून त्यांना काही नागरिकांच्या माध्यमातून खोटी माहिती देण्यात येत असल्यामुळे कोरची शहरातील बहुतेक नागरिकांच्या मनामध्ये आता नाराजीचे सूर सुद्धा दिसून येत आहे. यामुळे कदाचित झालेल्या या आंदोलनाला नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.

           मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत ला यावर्ष तीन योजने अंतर्गत निधी मंजूर असून जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान, दलितोत्तर व दलित वस्ती अशा तीनही योजनेच्या माध्यमातून यावर्षी नगरपंचायत ला जवळपास 69 लक्ष रुपये मंजूर आहेत. यावर्षी आतापर्यंत नगरोत्थान 14 लाख, दलितोत्तर ला 16 लाख रुपये व दलित वस्ती योजनेअंतर्गत एकूण 39 लाख रुपये मंजूर आहेत.

बॉक्स 

नगरपंचायत कोरची ला यावर्षी कुठलाही कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला नसून यावर्षी 69 लक्ष रुपयाचा निधी मंजूर आहे व वार्ड क्रमांक 8 मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या जुन्या दगडांची विहीरीचा बांधकाम संपूर्णपणे काँक्रिटीकरण करून करण्यात आलेला आहे आणि त्याची देयके अंदाजपत्रकानुसार देण्यात आलेली आहे.

.मंगेश नाकाडे कनिष्ठ अभियंता, नगरपंचायत कोरची