आरक्षणासाठी धनगर समाजाचे एक दिवसीय वसमत येथील तहसील समोर धरणे आंदोलन

Fri 26-Sep-2025,06:10 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली :-वसमत तहसील कार्यालय वसमत येथे आज धनगर समाजाची ST मधून आरक्षणाची शासनाने तत्काळ अमलबजावणी करावी म्हणून एक दिवसाचे धरणे आंदोलन धरले होते त्या आंदोलनास उपस्थित राहून शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दौलतराव हुंबाड यांनी धनगर समाजास पाठिंबा दर्शवला.

मागील ७० वर्षा पासून धनगर समाजाची मागणी आहे की त्यांच्या ST मधील आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी शासनाने करावी सत्तेत येण्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या क्याबीनेट मध्ये निकाली काढू म्हणून सांगितल पण आज त्यांना त्या आश्वासनाचा इतर आश्वासना प्रमाणे विसर पडला आहे..

ह्या आंदोलच्या माध्यमातून झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करून आश्वासनाची आठवण करून दिली.तहसीलदार शारदा दळवी ह्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिले.