महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव व अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली

Fri 26-Sep-2025,06:47 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली: दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अडवोकेट आत्माराम त्रिंबक राव दवणे यांनी एक महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली.

 हितेश बापूराव ढेमरे, वकील उच्च न्यायालय मुंबई, यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 नियुक्तीपत्र प्रदान करताना महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव आयु. राजेश हिरालाल भास्कर हे विशेष उपस्थित होते.

ही नियुक्ती संघटनेच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील जनतेपर्यंत काँग्रेस विचारधारा पोहोचविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.हितेश ढेमरे यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!