ओला दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा सध्या शेतकरीवर्गावर अस्मानी आणि सुलतानी असे दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे निसर्गाच्या आपत्तीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
१४ हजार कोटींची तरतूद कुंभमेळ्यासाठी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी केवळ २२०० कोटींची तुटपुंजी मदत जाहीर करून आपला असंवेदनशीलपणा दाखवून दिला आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेस कमिटीने केली.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे.
अतीवृष्टीमुळे वाहून गेलेल्या व बुडीत झालेल्या जमिनींसाठी विशेष मदत करावी.
ई-पीक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करावेत.
शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण (शासकीय व खाजगी संस्थांत) मोफत करावे.शैक्षणिक शुल्क माफ करून आवश्यक शैक्षणिक मदत द्यावी.
शेतकरी कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
तुरी,कापूस,सोयाबीन उत्पादकांचे नुकसान भरपाई स्वरूपात भरून काढावे.
भाजीपाला व फळ उत्पादकांना विशेष अनुदान द्यावे.
सोलर पंपाची सक्ती त्वरित हटवावी.
हमीभावाव्यतिरिक्त २० टक्के बोनस जाहीर करावा.
सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरे करावेत.
जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा.
OTS भरलेल्या शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज द्यावे.
या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
डॉ. अभ्युदय मेघे, सुधीर पांगुळ, बाळा माऊसकर, सुनील कोल्हे, सागर सबाणे, भारत भोंगाडे, संजय डोंगरे, संदीप महाकाळकर, पंढरी महाकाळकर, अनिल थोटे, नरेंद्र झाटे, वासुदेव गूघ, प्रमोद नगराळे, सुनील तळवेकर, विलास जवादे, नंदकुमार वानखेडे, संदीप शिंदे, सोहमसिंग ठाकूर, संजय कुबडे, अरुणा धोटे, लता नंदरधने, संगीता ठवळे, पवन गोसेवाडे, बंडू डफरे, सादिक शेख, विजय नरांजे, शुभम भगत, श्रीकांत धोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.