राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ शे.घाट च्या वतीने शारदोत्सव साजरा

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला
वरूड:दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री उत्सवानिमित्त २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ शें.घाट च्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाच्या संस्कृतिक सभागृहात शारदादेवीची माजी शिक्षिका जिजाबाई फरकाडे यांच्या शुभहस्ते स्थापना करण्यात आली. शारदा स्थापनेनंतर महिला भजन व हळदी कुंकू पार पडले. २३ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले, या कार्यक्रमानिमित्त शहरातील महिलांनी मंचावर आपल्या अंगी असलेल्या कलागुणाचे सादरीकरण केले. २४ सप्टेंबर रोजी काटोल नगरपरिषद हायस्कूलच्या शिक्षिका स्मिता बेलसरे यांनी "होय ! मी सावित्री बोलते" एकपात्री प्रयोग सादर केला. २५ सप्टेंबर रोजी सत्कार समारंभ सोहळा पार पडला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून वरूड मोर्शी मतदार संघाचे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांचा महिला मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यी अनुज येवले, सात्विक कुबडे, डॉ.पुनम सावरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रश्नमंजुषा कार्यक्रमांतर्गत महिलांचे खेळ व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी शुभम अकर्ते यांच्या मधुर वाणीतुन रंगत सुरांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर शारदा विसर्जन पार पडले.
या कार्यक्रमाकरिता मंडळाच्या अध्यक्षा संगिता बेले, उपाध्यक्षा सविता सावरकर, सचिव निलीमा कुबडे, सहसचिव निलिमा खेरडे, संचालिका पद्मा माळोदे, माधुरी माहोरे, चित्रा गणोरकर, संध्या सावरकर, सुस्मिता सावरकर, जोत्स्ना काळे, अर्चना बेलसरे, नलिनी शिरभाते, अमिता खंडेलवाल यांनी परीश्रम घेतले. पाचही दिवस पार पडलेल्या विविध कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.